पिंपरी – राजर्षी शाहू मित्र मंडळ व श्री साई मित्र मंडळ यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या अखिल शाहूनगर सार्वजनिक गणेशोत्सवात घेण्यात आलेल्या खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी प्राजक्ता मुळे-वायाळ, श्रीदेवी थायकुले, जयश्री मुळे, सौ . शेखावत, सौ पाटील यांना प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ व पाचव्या क्रमांकाचे अनुक्रमे पैठणी बक्षिसे देण्यात आली. तर सहभागी झालेल्या सर्वाना आकर्षक भेट दिली.
कला क्रीडा सांस्कृतिक समितीचे सभापती तुषार हिंगे, नगरसेविका अनुराधा गोरखे, शहर भाजपच्या उपाध्यक्षा सुप्रिया चांदगुडे, पुरंदर पंचायत समितीचे सभापती रमेश जाधव यांच्या हस्ते बक्षिसे वितरण करण्यात आले. यावेळी पूरग्रस्तांसाठी मंडळाच्या वतीने ५१ हजाराची मदतीचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे सुपूर्द केला.
सादरकर्ते प्रा. साहेबराव जाधव, अवधूत कुलकर्णी, शिरीष देशपांडे यांनी विनोदी किस्से सांगत केलेल्या खुमासदार निवेदनाने कार्यक्रमास रंगत आली. मंडळाने एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवला आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल शाहूनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक माजी नगरसेवक महेश चांदगुडे, अध्यक्ष भगवान मुळे यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन किशोर हरदास यांनी तर आभार तुकाराम जाधव यांनी मानले.