खैरखुटी येथे कुक्कुटपालन प्रकल्पांचे उद्घाटन

0

तर्‍हाडी। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विशेष केंद्रीय सहाय्य योजनेतून शिरपूर तालुक्यातील खैरखुटी, जामन्यापाडा, बुडकी, चाकडू या गावांमध्ये प्रकल्प मंजूर करण्यात आले. येथील गावातील बचत गटाला 100 टक्के अर्थसाहाय्यावर कुक्कुटपालन मंजूर करण्यात आले.

त्यात खैरखुटी येथे कुक्कुटपालन प्रकल्पांचे उद्घाटन आ.काशिराम पावरा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी बाळासाहेब जैन, वरिषठ जिल्हा समन्वयक अरविंद गोरे, एच.बी.चौधरी, बालकिसन पावरा, ललिता माळी, जयेश जगताप उपस्थित होेते. त्या कुक्कुटपालन प्रकल्पामुळे शिरपूर तालुक्यातील बचतगटातील महिला सक्षम होण्यास मदत होईल व त्यांच्या आर्थिक विकास होण्यास मदत होईल, असे मत आ.काशिराम पावरा यांनी मांडले. योजनेचा बचतगटानी लाभ घेण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.