खैर प्रजातीचे लाकूड पकडले, 10 लाखाचा माल जप्त

0

नवापूर । विसरवाडी ते कोंडाबारी रस्त्यावर गस्त करीत असतांना संशयित ट्रकची तपासणी केली असता त्यात अवैध ताज्या तोडीचे खैर जातीचे लाकुड पकडण्यात वनविभागाला यश मिळाले आहे. 12.663 घनमीटर असलेल्या खैर जातीच्या लाकडाची किंमत 86,641 व ट्रकची किमंत 9 लाख रुपये असे एकूण 9 लाख 86 हजार 641 रुपयांचा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी बलजितसिंग बरार, लक्कीकुमार भास्कर यांना अटक केले आहे. सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे व सहाय्यक वनसंरक्षक एस. आर. चौधरी, वनक्षेञपाल प्रथमेश हाडपे, नंदुरबार जे. ऐ. शेख सह नवापूर व नंदुरबारच्या वन कर्मचार्‍यांनी ही कारवाई केली. उपवनसंरक्षक पीयुषा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाही सुरु आहे.मुद्देमाल शासकीय विक्री आगार येथे जमा करण्यात आला आहे. बर्‍याच दिवसानंतर ही मोठी कारवाई वनविभागाने केली आहे. विसरवाडी ते कोडाईबारी हा रस्ता हायवे असून यात चिंचपाडा हद्द येते. परंतु चिंचपाडा वनक्षेपाल व वनकर्मचारी या कारवाईत दिसुन आले नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.