जळगाव – शहरातील टिळक नगरात राहणार्या एका व्यक्तीचे बीएचआर संस्थेच्या चेअरमन, व्हाईस चेअरमनसह जनरल मॅनेजर यांनी मिळून चाळीसगाव येथील एका कॉम्प्लेक्समधील 4 दुकानांचे खोटे करारनामे दाखवून 25 लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
येथील हस्तीबँक शाखा व नोटरी कार्यालयात 8 फेब्रुवारी 2016 रोजी संशयित प्रमोद भाईचंद रायसोनी चेअरमन, कल्पना प्रमोद रायसोनी व्हा. चेअरमन यांनी चाळीसगाव शहरातील मेजर कॉर्नर कॉम्प्लेक्समधील दुकान नं. 8, 9, 14 व 15 अशा 4 दुकाने त्यांच्या स्वत:च्या मालकीची असल्याचे सदर मिळकतीवर करारावर 25 लाख डिपॉजिट घेवून व दरमहा 2500 रूपये भाडे व मॅनेजमेंट असून 5 हजारावर भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी स्टेट सोसायटी यांना देण्याकामासाठी खोटे बनावट करारनामे तयार केली. यानंतर जनरल मॅनेजर कलाल शहादु माळी यांच्या संगनमताने सदरचे करारनामे खोटे भासवून अशी माहिती असूनही ते करारनामे जनरल मॅनेजर माळी यांनी खरे दाखवून भाईचंद हिराचंद रायसोनी सोसायटीच्या ठेवीदार व सभासदांची दिशाभूल करीत फसवणूक केली. या प्रकरणी शहर पोलिस स्थानकात सुनिल गफिचंद पाटील यांच्या फिर्यादीवरून कलम 409, 420, 465, 468, 471 (34) प्रमाणे संशयित आरोपी चेअरमन प्रदीप भाईचंद रायसोनी, व्हा. कल्पना प्रमोद रायसोनी, जनरल मॅनेजर सुकलाल शहादू माळी यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करयात आलेला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर करीत आहेत.