महाराजगंज: उत्तर प्रदेश हे राज्य लोकसभा निवडणुकीसाठी महत्वाचे असून, त्या राज्यातून देशाचा पंतप्रधान निवडला जातो. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या एकूण ८० जागा असून देशातील सगळ्या राजकीय पक्षांचे लक्ष उत्तरप्रदेशवर लागलेले असते.
आज उत्तर प्रदेशमध्ये देशातील प्रमुख पक्ष असलेले कॉंग्रेस आणि भाजपाच्या प्रमुख नेत्यांच्या सभा झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष अमित शहा, कॉंग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी वडेरा या प्रमुख नेत्यांच्या सभेने उत्तर प्रदेशची भूमी गाजली.
कॉंग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वडेरा यांनी महाराजगंज येथे सभा घेतली असून, त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आपल्या शैलित तोफ डागली. त्यांनी या सभेत पंतप्रधान आपल्याला सांगतात कि तुमच्या खात्यात १५ लाख टाकू, आणि त्याच पक्षाचे अध्यक्ष त्या १५ लाख रुपयांना ‘चुनावी जुमला’ म्हणतात. तुम्ही पुन्हा अशा लोकांवर विश्वास ठेवणार आहेत का? असा प्रश्न त्यांनी सभेतील उपस्थित असलेल्या मतदारांना केला.