ठेकेदारांची अर्धवट कामे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे शहरामध्ये विविध विकासकामे चालू आहे. पाईपलाईन टाकणे, महावितरणचे नवीन केबल्स टाकणे, एमएनजीएल, मोबाईलच्या केबल्स टाकणे आदी कामांसाठी सर्वत्र रस्ते खोदण्यात आले आहेत. काम पूर्ण झाल्यावर रस्ता नीट करण्यात आलेला नाही. पावसाळा तोंडावर आलेला असताना यामुळे मोठी अडचण होणार आहे. महापालिकेचे अधिकारीही याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. शहरात खड्डेच-खड्डे असतपाना महापालिका कुठे गेली, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
खड्ड्यांमध्ये पाणी साठून
आता नुकताच अंदमानमध्ये मॉन्सुन दाखल झाल्याचे वृत्त वाचले. सात जून रोजी मॉन्सून महाराष्ट्रात येणार आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पावसाळ्यासाठी रस्त्यांचे डांबरीकरण अजून केले गेले नाही. जर पावसाळ्यापूर्वी या रस्त्यांचे डांबरीकरण झाले नाही, तर सर्वत्र चिखल होऊन अपघात घडतील. याशिवाय खड्ड्यांमध्ये पाणी साचून नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ होईल. शहरात चोवीस तास पाणीपुरवठ्याकरिता ठिकठिकाणी जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. भूमिगत केबल टाकण्याचेही काम महावितरणकडून सुरू आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर त्वरित रस्त्याचे डांबरीकरण ककाम करण्याची जबाबदारी संबंधितांची आहे. मात्र तसे होताना दिसत नाही.
डांबरीकरणाच्या सूचना
पिंपरी-चिंचचवड महापालिकेचे शहर अभियंता अंबादास चव्हाण म्हणाले की, पाणीपुरवठा आणि महावितरण या दोन्ही विभागांनी खोदलेले रस्ते ते स्वतः पूर्ववत करणार आहेत. तर अन्य रस्त्यांचे डांबरीकरण महापालिका करेल. संबंधितांना लवकरात लवकर रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.