खो खो राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी मुंबई उपनगरचा संघ जाहीर

0

मुंबई । सांगली आयोजित 34 वी किशोर-किशोरी (14 वर्षाखालील) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत सहभागी होणा-या मुंबई उपनगरच्या संघांची घोषणा संघटनेचे कार्यवाह श्री. प्रशांत पाटणकर यांनी केली, मुलांच्या संघाचे कर्णधारपद वांद्रयाच्या महात्मा गांधी विद्यामंदिरचा धीरज भावे भुषवेल तर किशोरी संघाचे नेतृत्वाची जबाबदारी सह्याद्री विद्यामंदिर भांडूपच्या समिक्षा शेलारकडे सोपविण्यात आली आहे.

मुंबई उपनगरचे संघ खालील प्रमाणे
किशोर संघ : धीरज भावे (कर्णधार), गणेश झोरे, सुजय जाईगडे, निखिल सोडये, रामचंद्र झोरे, आनंदा झोरे (सर्व महात्मा गांधी विद्यामंदिर), अश्‍विन यादव (आय. बी. पटेल म्यू स्कुल), ओमकर सावंत (नंदादीप विद्यालय), वैष्णव पाटणकर, अंश पाटील (सर्व सह्याद्री विद्यामंदिर), अजित यादव, सचिन पटेल (सर्व उन्नतनगर म्यु. स्कुल) प्रशिक्षक : नितीश पानवलकर , व्यवस्थापक : सौरभ मयेकर.

किशोर गट ः समिक्षा शेलार (कर्णधार), तन्वी थेराडे, जान्हवी परब, निर्जला राऊत, काजल बिनवडे, कात्यायनी नाडकर्णी (सर्व सह्याद्री विद्यामंदिर), देविका अहिरे (न्यू इंग्लिश स्कुल), स्नेहल चिंदरकर, पुर्वा तटकरे, दिक्षा तांबे, मुस्कान नाईक, गौरी शिंदे (सर्व महात्मा गांधी विद्यामंदिर), प्रशिक्षकः मंगेश सुर्वे, व्यवस्थापिका : कोमल भायदे