जळगाव । शहरातील महापालिकेच्या ख्वाजॉमियॉ झोपडपट्टीच्या जागेवर भाजीबाजार भरविण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. या जागेवर असलेले व्यापारी संकुल व वाहनतळाचे आरक्षण बदलवून ते भाजीबाजाराचे करण्याची चाचपणी करीत असल्याची माहीती महापौर नितिन लढ्ढा यांनी दिली. दरम्यान आज महापौर, उपमहापौर व आयुक्तांनी या जागेची पाहणी करुन याठिकाणी भाजी विक्रेत्यांसाठी सुविधा करण्याच्या सूचना देखील दिल्यात.
जागा तात्पुरत्या स्वरुपात देण्याचा ठराव
सुप्रिम कोर्टाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या निर्देशानुसार जळगाव शहरातील प्रमुख रस्त्यांवरील व वाहतुकीस अडथळा होणार्या 11 ठिकाणांवरील सुमारे 892 हॉकर्सचे पयार्यी जागेत स्थलांतर करण्याचा निर्णय त्यानुसार महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने टप्प्या टप्प्याने हॉकर्सचे स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. यानुसार सुमारे बळीरामपेठ व सुभाषचौकातील भाजीबाजारसह विक्रेत्यांना हटविण्यात आले आहे. त्यामुळे भाजीविक्रेते रस्त्यावर काठेही बसत असल्याने महापालिका प्रशासनाने ख्वॉजामियॉ झोपडपट्टीची जागा तात्पुरत्या स्वरुपात भाजी बाजारासाठी देण्याचा ठराव केला. त्यानुसार या जागेचे सपाटीकरण करण्यात येत आहे.
सुविधांसाठी अधिकार्यांना सुचना
या जागेवर व्यापारी संकुल व वाहनतळाचे आरक्षण होते, हे आरक्षण बदलवून त्याजागी भाजी मार्केट किंवा भाजी बाजाराचे आरक्षण घेण्यासाठी चाचपणी करण्यात येत असल्याचे महापौर लढ्ढा यांनी सांगीतले. तसेच या महापौर नितिन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे, आयुक्त जीवन सोनवणे यांनी ख्वॉजामिया झोपडपट्टीच्या जागेची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत पदाधिकारी नगरसेवक व सर्व अधिकारी देखील होते. भाजी बाजार भरविल्यनतंर याठिकाणी लाईट, पिण्याचे पाणी कचरा संकलनासाठी कचरा कुंड्या तसेच पार्कींगसाठी जागा करुन आखणी करण्याच्या सुचना लढ्ढा व आयुक्त जीवन सोनवणे यांनी उपस्थित अधिकारी यांना दिल्यात.