गंज पेठेत दुचाकी जाळल्या

0

पुणे : रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांना लक्ष्य करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी गंज पेठेतील नाल्याजवळ पार्क केलेल्या पाच गाड्यांना अज्ञाताने आग लावून पेटवून दिले. या आगीत पाचही गाड्या जळून खाक झाल्या. सुदैवाने अग्निशामक दलाची गाडी त्वरित पोहचल्याने पुढील अनर्थ टळला.

दुचाकीच्या मागच्या बाजूला असलेल्या टपर्‍या त्यात सापडून आग भडकण्याची शक्यता होती. लहुजी वस्ताद तालीमजवळ नाल्याशेजारी काही जणांनी आपल्या दुचाकी पार्क केल्या होत्या. पहाटे 3.15 वाजता कोणीतरी येथील पाचही दुचाकींना एकाच वेळी आग लावली. अग्निशामक दलाच्या मुख्य केंद्रापासून हे ठिकाण जवळच असल्याने अग्निशामक दलाची गाडी तातडीने तेथे पोहचली़. तोपर्यंत या पाचही गाड्या जळाल्या होत्या. जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणली. या गाड्यांच्या मागे काही टपर्‍या होत्या. या टपर्‍याच्या मालकांनी सरंक्षणासाठी वरच्या बाजूला पुढे बार उभारून कापड लावले होते. या आगीत ती कापडे जळून त्यांचे बारही वितळले. याप्रकरणी फरासखाना पोलीस अधिक तपास करीत आहेत.