जळगाव । गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या 20 वर्षीय तरूणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना जयस्वाल नगरात घडली असून जिल्हा सामान्य रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. यावेळी मुलीच्या आई व भावाने हंबरडा फोडला होता. मिळालेल्या माहितीनुसार, स्वाती दिलीप भोई (वय-20) रा. जयस्वाल नगर ही गेल्या काही महिन्यांपासून अस्तिमाच्या आजाराने त्रस्त असतांना श्वासोच्छवास करण्यास त्रास होत होता. तीच्या कुटुंबियांनी तिला जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. त्यावेळी असतांना तिच्यावर योग्य उपचार केल्यानंतर जिल्हा सामान्य रूग्णालयातून डिसचार्ज दिला गेला होता. सोमवार 30 जुलै रोजी दुपारी घरी असतांना तिला श्वास घेण्याचा त्रास सुरू झाला होता. स्वातीचे वडील दिलीप भोई यांनी तातडीने खासगी गाडीने जिल्हा रूग्णालयात नेले. जिल्हा रूग्णालयात वाटेत येत असतांना तिला अंजिठा चौकाजवळ एक उलटी देखील झाली. त्याचवेळी तिचा प्राणज्योत मालावली होती. जिल्हा रूग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकिय अधिकारी प्रविण पाटील यांनी मृत घोषीत केले. मृत्यूची वार्ता कळताच मयत स्वातीच्या आई व भावाने एकच हंबरडा फोडला.