पिंपरी-गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणपती मूर्ती बनविण्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर देण्यात येत आहे. पर्यावरणाचे संवर्धन व्हावे उद्देशानेच गगनगिरी फाऊंडेशनतर्फे गृहिणींना शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी ठोस उपाययोजना होत नाही. त्यात कोठे तरी खारीचा वाटा गृहिणींनी या माध्यमातून घेतलेला आहे हा उपक्रम फायदेशीर आहे असे क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा उमा क्षीरसागर यांनी सांगितले.
यामध्ये ४० ते ४५ महिलांनी सहभाग घेतला होता. ज्याची मूर्ती रेखीव व सुंदर असेल अशा मूर्तीसाठी बक्षीसही ठेवण्यात आले होते. परीक्षण उमा क्षीरसागर, शेळके पाटील, विभावरी इंगळे, चारुलता चौधरी यांनी दिले. संपूर्ण जागेची व्यवस्था व आयोजन मनीषा पाटील यांनी केले.