गगनगिरी विश्‍व फाऊंडेशनच्यावतीने रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षकांचा सन्मान

0

देहूगाव । आदर्श शिक्षक म्हणून गगनगिरी विश्‍व फाऊंडेशनने बुधवारी शिक्षकदिनाचे औचित्य साधून येथील रयत शिक्षण संस्थेच्या मराठी, इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील सर्व शिक्षकांचा उचित सन्मान केला. शिक्षक दिनाचेऔचित्य साधून शिक्षकांसाठी सन्मान व शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन गगनगिरी विश्‍व फाऊंडेशनच्यावतीने देहू गावातील दोन्ही शाळेच्या 48 शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते.

यावेळी मानसिक पातळीवर अभ्यासू व्यक्तिमत्व वृषभनाथ कोडकरांचे असून, काही दिवसांपूर्वी याच शाळेतील 100 विद्यार्थ्यांना गगनगिरी विश्‍व फाऊंडेशनच्यावतीने शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. मुलांनी व शिक्षकांनीही शाडू मातीच्या मूर्ती छान बनविल्या होत्या. त्याच पद्धतीने एका मातीच्या गोळ्यापासून गणपती स्वतःच्या हाताने आपण घडवतो. तसेच आपल्या विद्यार्थ्यांनाही शिक्षकांनी घडवले. तरच त्यातून बुद्धीवादी गणपती तसेच कार्तिकस्वामीही आपण घडवू शकतो. आपण शिक्षक का झालो तर यात आपले कर्मबंध जोडलेले असते. विद्यार्थ्यांना घडवण्याची संधी फक्त शिक्षकांनाच मिळते हे शिक्षकांचे थोर भाग्य आहे. भारतातील प्रत्येक शिक्षकाने एकजरी विद्यार्थी गणपती बाप्पाप्रमाणे घडविला तर असंख्य विद्यार्थी घडतील, असे विचार वृषभनाथ कोंडेकर यांनी मांडले.

गगनगिरी विश्‍व फाऊंडेशनने श्रीगणेशा जशा पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणपती मूर्ती बनवण्यापासून केला त्याचपद्धतीने शैक्षणिक क्षेत्रातील त्या मुलांचा सर्वांगिण विकास व्हावा, ज्यांना चांगले संस्कार व अभ्यासाच्या सोप्या तांत्रिक बाबी शिकून जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने अभ्यास कसा करावा. मुलांना त्यांच्या क्षमता समजून आपण काही करून दाखवू शकतो. त्यातून त्यांचा व्यक्तिमतत्त्व विकास घडवता येतो. यासाठी बुधवारी प्रथम शिक्षकांना शिक्षकदिनानिमित्ताने कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

महिला व मुले यांचा शारिरीक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक व योगिक पद्धतीने म्हणून तन, मन सुदृढ बनवून विकास करता येईल. यावरच गगनगिरी फाऊंडेशन काम करत असल्याची माहती फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा रेखा भोळे यांनी दिली. नचिकेत बालग्राम अश्रमाच्या शाळेतील शिक्षकांचा सत्कार शिक्षकदिनानिमित्ताने गगनगिरी विश्‍व फाऊंडेशनने केला. यामध्ये येथील प्राचार्य नयनाताईंनीही सहकार्य केले.

देहूच्या संत जिजाबाई कन्या विद्यालयाच्या प्राचार्य शुभांगी पंडित व इंग्लिश मीडियमच्या प्राचार्य वैशाली हराळ यांनी तसेच अनंद तांबे व अशोक भंगाळे यांनी आयोजन केले होते. यासाठी संस्थेचे पदाधिकारी गौरी सरोदे, विभावरी इंगळे, चारुलता चौधरी, प्रणाली चौधरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. वृषभनाथ कोंडेकर यांनी खूप सुंदर व सुरेख शब्दरचनेमध्ये टिचर ट्रेनिंग दिले. सुभाष भोसले यांनी आभार मानले.