गटविकास अधिकार्‍याच्या प्रयत्नांनी प्रकल्प कार्यान्वीत

0

नवापूर । येथील गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून जलसंधारण आणि हंगामी स्थलांतरावर प्रभावी उपाययोजना केली आहे. नंदकुमार वाळेकर यांना डाळीआंबा ता.नवापूर येथे भेटी दरम्यान एक फुटलेला जुना पण मोठा बंधारा आढळून आला. बंधारा दुरुस्त केल्यास शेतीसाठी कसा फायदा होईल. शिवाय 100 ते 150 रूपयाच्या रोजगारासाठी गुजरातमध्ये वणवण का करावी याबाबतीत त्यांनी गावातील तरूणांशी आणि महिलांशी चर्चा केली. त्या सर्वानी सकारात्मक साथ दिली.

गावाने दाखविली एकजुट
जलसंधारणासाठी सरपंच, उपसरपंचासह संपूर्ण गावाने एकजूट दाखवत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जुन्या बंधार्‍यांतील गाळ काढण्याच्या कामाला सुरवात केली. 150 लोकांच्या प्रेरणेतून आणि शासकीय योजनेच्या सहकार्यातून अखेर बर्‍यांच वर्षापूर्वीपासून फुटून गेलेल्या बंधार्‍याचा बांध घालण्याचे काम सुरू केले. यामुळे येत्या पावसाळ्यात डाळीआंबा गावाचे शिवार नक्कीच जलसमृध्द होणार यात शंका नाही.