साक्री। गटारीची घाण घरासमोर टाकल्याच्या कारणावरून तालुक्यातील धमणार येथे दोन कुटूंबात वाद होवून मारहाण झाली. याप्रकरणी परस्पर फिर्यादीवरून पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धमनार येथील हिलाल दगाजी काकुस्ते यांच्या वडीलांनी गटारीची घाण राजेंद्र काकुस्ते यांच्या अंगणात टाकली. या कारणावरून राजेंद्र काकुस्ते, दादाभाई काकुस्ते, जितेंद्र काकुस्ते यांनी हिलाल काकुस्ते व त्यांचे वडील दगाजी काकुस्ते यांना शिवीगाळ करून हातातील काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत हिलाल काकुस्ते यांचा उजवा हात फ्रॅक्चर झाला आहे. याप्रकरणी हिलाल काकुस्ते यांनी साक्री पोलिसांत तक्रार दिल्याने वरील तिघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. तर राजेंद्र डिगंबर काकुस्ते यांनी दिलेल्या फिर्यादनुसार, गटारीची घाण माझे घरासमोर का टाकली असा जाब विचारला असता दगा काकुस्ते, मोहन काकुस्ते, पप्पु काकुस्ते यांनी राजेंद्र काकुस्ते यांना पोटावर, पाठीवर मारहाण केली. तसेच डोक्यावद देखील मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणी राजेंद्र काकुस्ते यांच्या तक्रारीवरून साक्री पोलीसांत दगा काकुस्ते, मोहन काकुस्ते, पप्पु काकुस्ते यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ. पी.एन. चव्हाण यांना सोपविण्यात आला आहे.
धुळ्यात 19 वर्षीय तरूणी बेपत्ता
धुळे । शहरातील वलवाडी परिसरातील एक 19 वर्षीय तरूणी राहत्या घरातून कोणस काही एक न सांगता निघून गेली. याप्रकरणी युवतीच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरून पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात मिसींगची नोंद करण्यात आली आहे. तीचा सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून न आल्याने तिचे वडीलांनी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात याबाबत खबर दिल्याने मिसींगची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास असई. पाटील करीत आहेत.
दोघा भावांना झोडपले
धुळे । वेल्हाणे येथील संतोष दगा काळे (60) यांची कुंडाणे शिवारात शेती आहे. सदर शेती रोख वटाईने करायला का देत नाही ? या कारणावरून प्रदिप बापु मराठे व संदीप बापु मराठे यांनी संतोष काळे व त्यांचा भाऊ भिकन यास लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच त्यांना पाठीवर कमरेवर बेदम मारहाण करून दुखापती करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी संतोष काळे यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे.