‘गडकरी जरा तब्येतीकडे लक्ष द्या’; पवारांचा गडकरींना सल्ला !

0

पुणे- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राहुरी कृषी विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभाच्या कार्यक्रमात भोवळ आल्याची घटना घडली आहे. यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी गडकरींना कष्ट कमी करण्याचा सल्ला दिला आहे. शरद पवार यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत गडकरींनी कष्ट कमी करावेत व तब्येतीकडे लक्ष द्यावे असे म्हटले आहे.

तसेच त्यांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून शुभेच्छाही दिल्या आहेत. तुम्ही जास्तीचे काम करता आहात, मात्र त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. गडकरीजी काळजी घ्या असेही शरद पवार यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.