भडगाव – शहरातील यशवंतनगर भागातील गणपती मंदीरातुन मध्य रात्री चोरट्याने दान पेटी लांबविली असुन हा सर्व प्रकार मंदीराच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाला आहे.चोरट्याने चेहऱ्यावर रुमाल टोपीने बांधलेला असल्याने चोरट्याची ओळख मात्र पटत नाही. यशवंतनगर भागातील चौकात असलेले गणपती मंदीरात मध्य रात्री चोरट्याने मंदीराचे गेटला असलेल कुलुप तोडुन मंदीरातुन दान पेटी चोरून नेली.पुर्ण चौकात लाईटाने छगमग असलेल्या मंदीरात चोरी झाल्याने परिसरात भितिचे वातावरण निर्माण झाले आहे.