गणेशनगरातील घरातून साडेआठ हजारांच ऐवज लंपास

0

जळगाव। जिल्हा कारागृहाच्या मागील बाजूस असलेल्या गणेशनगरातील एका घरात कुटूंबिय झोपलेले असतांना अज्ञात चोरट्यांनी घरातील साडेआठ हजारांच्या मुद्देमालावर डल्ला मारल्याची घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली असून याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेशनगर भागात विक्की बबन शिंदे (वय-21) हा आईवडील कुटूंबीयांसह वास्तव्यास आहे. गुरूवारी सकाळी शिंदे कुटूंबीय जागी झाल्यावर त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्षनास आले. विक्की पहाटे तीन वाजता बाथरुमला जाण्यासाठी उठला असतांना त्याचा मोबाईल बिछान्या जवळच ठेवुन तो पुन्हा झोपुन गेला. सकाळी उठल्याव मोबाईल सापडत नसल्याने त्याने शोधाशोध केल्यावर घरातील कापाटतून 4 हजार 800 रुपये चोरी झाल्याचे निदर्षनास आले. याप्रकरणी विक्की शिंदे यांने जिल्हापेठ पोलिसांत तक्रार दिल्यावरुन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन, 4 हजार 800 रुपये रोख व 4 हजार रुपयांचा मोबाईल असा 8 हजार 800 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे.