जळगाव । शहरातील पंचमुखी हनुमान मंदीरामागे राहणार्या 19 वर्षीय तरूणी कॉलेजला जात असल्याचे सागून सायंकाळी उशिरापर्यंत न झाल्याने मामा यांनी एमआयडीसी पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पंचमुखी हनुमान मंदीरामागे राहणार्या ज्ञानेश्वर काशिनाथ चौधरी (वय-32) यांची भाची पुजा संजय चौधरी (वय-19) रा. पंचमुखी हनुमान मंदीरामागे, गणेश वाडी ही मुलगी 10 मार्च रोजी 2.30 वाजता कॉलेजला जावून येते असे सांगून कॉलेजला गेली. सायंकाळी उशिरापर्यंत ती घरी न आल्याने तीची शोधाशोध करण्यास सुरूवात केली. तसेच तीच्या मैत्रिणींच्या घरी देखील जावून आल्यानंतर तीची माहिती न मिळाल्याने ज्ञानेश्वर चौधरी यांच्या तक्रारीनुसार एमआयडीसी पोलिसात 24/2018 प्रमाणे हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.कॉ. संतोष सोनवणे करीत आहे.