राजगुरुनगर : राजगुरुनगर शहरात नित्याने होणार्या वाहतूककोंडीवर कमीत कमी गणेशोत्सव काळात उपाययोजना म्हणून राजगुरुनगर पोलिस स्टेशनच्या वतीने काही निर्बंध जाहीर केले होते. यात गणेशोत्सव काळात अवजड वाहने आणि कंपन्यांच्या बसेस प्रवेश करण्यास दि. 6 सप्टेंबरपर्यंत बंदी करण्यात आली होती.मात्र लांब राहणार्या तसेच इतर गावात जाणार्या कामगारांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आल्याने भाजप खेड तालुका कामगार आघाडीचे उपाध्यक्ष शैलेश भोसकर यांनी याविषयी निवेदन दिले.
पोलिस विभागानेही यावर चर्चा करून कामगारांच्या सोयीसाठी फक्त सातव्या, दहाव्या व बाराव्या दिवशी बसेसना शहरात प्रवेश बंदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कामगारांनी समाधान व्यक्त केले असून पोलिस व प्रशासनाला योग्य ते सहकार्य केले जाईल अशी ग्वाही शैलेश भोसकर यांनी दिली.