गणेशोत्सवानिमित्त रनिंग स्टाफद्वारे विविध कार्यक्रमांचे आयोजन

0

भुसावळ- काल गुरुवारी १३ रोजी गणेश चतुर्थीनिमित्त रनिंग स्टाफद्वारे रेल्वे स्टेशन फ्लॅटफॉर्म क्रमांक ३ तसेच सीवायएम ऑफिस यार्डात श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली. सीडीईई (टीआरओ) द्वारा श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. दरम्यान आज मंडळस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये नांदगाव, बडनेरा, इगतपुरी, खंडवा, पेसेज प्लॉबी तसेच गुडस लॉबी सहा टीमने भाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कारकर्त्यांनी सभासदांनी परिश्रम घेतले.

स.हा.मं.वि.अ. श्री.गोयल, पी.एस.पदम, युनूस खान, ए.टी.खंबायत, आर.वाय.भोळे, ए.के.कुलकर्णी, एम.एस.इंगळे, जी.एस.पाटील, वाय.डी.ढाके, एम.पी. चौधरी, जी.आर.वराडे, गोकुळ महाजन, योजना चोपडे, डी.बी.महाजन, एस.एस.आवारकर, पी.एन.कारसाळे, के.पी.चौधरी, एन.के.धाडे, आर.एम.चौधरी, एन.डी.सरोदे, एन.बी.बारी, जे.एस.सोनावणे, पी.जी.तांबोळी, पी.आर.पाटील, एस.आर.पाटील, पी.पी.भंगाळे, किरण धांडे, वाय.ए.कोल्हे, जे.एस.पाटील, मुर्तुजा अली, जी.ए.पाटील, के.पी.हिरे, रमाकांत चौधरी आदींची यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाची रूपरेषा
उद्या शनिवार १५ रोजी भोजन तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजेपासून रंगभवन येथे या कार्यक्रमास सुरुवात होणार आहे.

रविवारी १६ रोजी महिलांसाठी आणि लहानमुलांसाठी विविध स्पर्धांचे तसेच करिअर विषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. रंगभवन येथे हा कार्यक्रम होणार असून प्रमुख मार्गदर्शक आणि उपस्थिती प्रा.राजश्री देशमुख, निलेश मोरे हे असणार आहे.

सोमवारी १७ रोजी श्रीगणेश विसर्जन होणार आहे. सी.वाय.एम.ऑफिस जवळील तापी नदी काठी विसर्जन होणार आहे. यावेळी सर्व गणेश भक्तांना उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.