जळगाव। जिल्हापेठ परिसरातील मंगल कार्यालयात नातेवाईकांकडे लग्नाच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रितेश सुभाषचंद लोढा यांच्या बंद घरातून चोरट्यांनी दागिणे तसेच रोख रकमेसह चार लाखांचा ऐवज लंपास केला आहे़ भरदिवसा साडेअकरा वाजेच्या सुमारास चोरी करून चोरट्यांनी पुन्हा एकदा पोलिसांना आव्हान दिले आहे़ प्रितेश लोढा हे शहरातील सुप्रसिध्द रतनलाल सी बाफना ज्वेलर्स मध्ये कामाला आहेत़ ते भाड्याने गजानन कॉलनीतील मधुबन अपार्टमेंटमधील 24/1 नंबरच्या प्लॅटमध्ये पत्नी व आई यांच्यासोबत वास्तव्याला आहेत़
चोरट्यांनी 13 तोळे दागिने व 50 ग्रॅम चांदी केली लंपास
लोढा यांचे आतेभाऊ सुदर्शन बरडीया यांचे 29 रोजी लग्न असून शुक्रवारी जिल्हापेठमधील ओसवाल मंगल कार्यालयात बरडीया यांचा लग्नापूर्वीचा कार्यक्रम होता़ या कार्यक्रमासाठी सर्व कुटुंबिय गेले होते. दरम्यान 11 वाजता लोढा हे त्यांची आई सरोज लोढा यांना घेण्यासाठी मधुबन अपार्टमेंट खाली आले़ आई खालीच थांबली असल्याने दुचाकीवरून लोढा यांनी आईला ओसवाल मंगल कार्यालयात सोडले़ यानंतर अक्षयतृतीया असल्याने त्यांनी आंबे खरेदी केले़ भाचा संभव जैन याच्यासोबत दुचाकीवरून आंबे घरी ठेवण्यासाठी आले असता दोन दरवाजापैकी एक दरवाजा उघडा तर आतील दरवाजाच्या कोयंडा कापलेला दिसला़ घरात पाहणी केली असता लाकडी कपाटामधील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला. प्रितेश लोढा यांनी पत्नीसाठी घेतले 13 तोळे दागिणे व 50 ग्रॅम चांदी लाकडी कपाटातील ड्राव्हरमध्ये ठेवलेली होती़ तसेच घरात खर्चासाठी काढून ठेवलेले 10 हजार रूपयेही प्रियंका लोढा यांच्या पर्समध्ये या गुन्ह्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्थानकात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.