निजामपुर। साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील निजामपुर येथील आई तुळजा भवानी गणेश मित्र मंडळाचा अध्यक्षपदी निजामपुर गावातील सामाजिक कार्यकर्ता व मुस्लीम सामुदायीक आसिफबेग मिरजा यांची निवड करण्यात आली आहे. त्यांची निवड ही सामाजिक एकोपाबद्दल संदेश देणारी असणार आहे.
यागणेश मंडळाची कार्यकारीणी अशी उपाध्यक्ष महेंद्र गोकुळ वाणी, खजिनदार गणेश आसाराम पाटील, सचिव हेमंत वसंत बेद्रे यांची तर सदस्यपदी मनिष वामन जगताप, सतिष एकनाथ वाणी, राहुल आसाराम पाटील, मनोज दत्तात्रय मुसळे, तुषार अशोक भामरे, त्रिलोक केशव दवे, नरेंद्र चिधु शिपी आदीची निवड करण्यात आली आहे. गणेश विसर्जन 7 व्या दिवशी होत असते. मुस्लीम समुदायाच्यावतीने गणेश विसर्जन प्रसंगी गणेश भक्तांना पाणी व नाश्ता देण्यात येणार असून मंडळाच्या अध्यक्षांचा सत्कार करण्यात येणार आहे.