जळगाव । येत्या 25 ऑगस्ट रोजी गणेशमंडळांसह घरोघरी गणरायाचे ढोलताश्यांच्या गजरात स्थापना करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील बाजारपेठेत विविध प्रकारच्या बाप्पाच्या मुर्त्या विक्रीसाठी आल्या आहेत.
टॉवर चौकासह घाणेकर चौक, सुभाष चौक तसेच अंजिठा चौफुली येथे विक्रेत्यांनी विक्रीसाठी स्टॉल्स लावले आहेत. तर गणरायाची मुर्ती खरेदी करण्यासाठीही नागरिकांनी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. 50 रूपयांपासून ते 30 हजार रुपयांपर्यंतच्या मुत्या बाजारात उपलब्ध आहेत. तसेच पुजेचे साहित्याचे स्टॉल्स् देखील लागले आहेत. आता फक्त बाप्पाच्या आगमनाची भक्त आतुरतेने वाट पाहत आहेत.