चाळीसगाव । शहरातील व राष्ट्रीय महामार्गावारील काही ठिकाणी गतीरोधक असल्याने फलक झाडा झुडपांमध्ये झाकल्या गेल्याने अपघातामध्ये वाढ झाली असून मागील आठवड्यात शहराबाहेरील नगरपालिकेच्या बंद असलेल्या डेराबर्डीवरील जुन्या जकात नाक्यासमोर गतीरोधक जवळ दोन तरूणांचा चालकाला गतीरोधक न दिसल्याने अपघात होऊन बळी गेल्याची घटना घडली आहे. संबंधित विभागाने अश्या झाकलेल्या गतीरोधक दर्शक फलक मोकळे करावे अशी मागणी होऊ लागली आहे. वाहने चालवितांना गतीरोधक दिसावेत यासाठी ठराविक अंतरावर संबंधित विभागाच्यावतीने रस्त्याच्या कडेला गतीरोधक दर्शनक फलक लावलेले असतात. यामुळे वाहन चालकांना ते फलक दिसून त्यानुसार चालक आपल्या गाडीच्या वेगाला आवरून चालत असतो. त्यामुळे अपघात हेण्याची शकत्या कमी होते.
गतीरोधक न दिसल्याने वाहन पटली होऊन होतो अपघात
चाळीसगाव शहरातच्या बाहेर मात्र काही गतीरोधक दर्शक फलक झुडपांनी झाकले गेले आहे. त्यामुळे वाहन चालकांना अंदाज येत नाही व अचानकपणे समोर गतीरोधक आल्याने गाडी उधळून अपघात होण्याचे प्रकार घडले आहे. शहरातील धुळे रोडवर एक गतीरोधक दर्शक फलक झुडपांमध्ये दाबला गेला असून बर्याचदा अंदाज न आल्याने वाहन उधळून अपघात झाले आहे. चाळीसगाव महामार्ग मागली काळात खराब असल्याने वाहन थोड्याप्रमाणावर सावकाश चालत होती पाण आता हा महामार्ग नवीन झाल्याने वाहने सुसाट व जोरात चालत असल्याने अश्या वाहनांना अंदाज येत नसल्याने अपघातात वाढ झाली आहे. मागील आठवड्यात डेराबर्डी वरील गतीरोधकच्या अगदी जवळच गतीरोधक दर्शक फकल असल्याने धुळेकडून चाळीसगावकडे येणार्या महेंद्रा बोलेरो वाहनाच्या चालकला गतीरोधकचा अंदाज न आल्याने समोरून येणार्या डेराबर्डी येथील दोघा तरूणांचा मोटारसायकलला आदळल्याने दोघांचा मृत्यू झाला होता.
गतीरोधकजवळ पांढरे पट्ट्यांचा गरज
याप्रकरणी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी अपघातग्रस्त वाहन चालकांला जामीन मिळून जातो पण या अपघातात दोघा तरूणांचा मृत्यू झाल्याने परीवारावर मोठी शोककळा पसरते आणि त्या परीवाराचा आधारस्तंभ हिरावून जातो म्हणून संबंधित विभागाने याकडे गांभिर्याने लक्ष देवून ठराविक अंतरावर असे गतीरोधक दर्शक फलक लावण्याची गरज आहे. त्यामुळे या चालकांना अंदाज येवून अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल तसेच ज्या ठिकाणी असे गतीरोधक बसविले असतील त्या ठिकाणी झेब्रा पट्टे अथवा पांढरे पट्टे मारावेत अशी मागणी देखीत आता वाहनधारकांकडून होत आहे.