गरजू महिलांना केले गॅस कनेक्शन वाटप

0

भुसावळ । येथील राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशीय फाऊंडेशनतर्फे गरजू महिलांना प्रधानमंत्री उज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शन वाटप करुन प्रमाणपत्र देण्यात आले. यामध्ये बीपीएल कार्डधारक महिलांना विशेष सवलत देण्यात आली. या योजनेचे अर्ज स्वामी इंडियन गॅस एजन्सी येथे उपलब्ध असून ही योजना फाऊंडेशनच्या माध्यमातून परिसरातील महिलांना सांगून अर्ज भरण्यात आले होते. याअंतर्गत रेल्वे हॉस्पिटल, न्यू आंबेडकर नगर, कालिमाता मंदिर मैदान परिसर येथे लाभार्थी महिलांना गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले. यामध्ये शोभा तायडे, मिना मोरे, अनित सावंत, संगिता सुरवाडे, सीमा कंकाळ, नसिमबानो खान, सुनिता जाधव, कलाबाई जाधव, अश्‍विनी भिडे, कमल ढिवरे, सुरेखा तपासे या 11 लाभार्थ्यांना गॅसवाटप करण्यात आले.

यशस्वीतेसाठी यांनी घेतले परिश्रम
याप्रसंगी गॅस एजन्सीचे उमेश निमसे, दिपक पाटील, संजय वाणी, किरण कोळी, जयंत कुरकुरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन फाऊंडेशनच्या अध्यक्षा राजेश्री सुरवाडे यांनी केले. यशस्वीतेसाठी सचिव निर्मला सुरवाडे, द्रोपदाबाई बाविस्कर, वंदना चोरपगार, छाया बाविस्कर, संगिता सुरवाडे, सुनंदा सुरवाडे यांनी परिश्रम घेतले.