गरजू विद्यार्थ्यांना केले वह्यांचे वाटप

0

पिंपरीः नित्यसेवा सोशल फाउंडेशनतर्फे मावळ तालुक्यातील विविध शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.
फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद मगर, उपाध्यक्ष मारिया थॉमस, सचिव विशाल मकासरे, खजिनदार डॉमनिक फर्नांडिस, कार्याध्यक्ष संजय त्रिभुवन, संचालक संजय जाधव, अमोल साळवे, संतोषी मंडकी, ब्राह्मणवाडी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सरिता पवार, सुनंदा आसबे, धामणे शाळेच्या मुख्याध्यापिका गीता चाफळकर आदी उपस्थित होते. या उपक्रमाद्वारे मावळ तालुक्यातील ब्राह्मणवाडी जिल्हा परिषद शाळा, परंदवाडी जिल्हा परिषद शाळा आणि धामणे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.

मुख्याध्यापिका पवार म्हणाल्या,जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्य पुस्तके शासनाकडून मिळतात. परंतु, विद्यार्थ्यांना दुसर्‍यावर अवलंबून रहावे लागत आहे. ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी समाजाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना कोणत्या समस्या भेडसावतात त्या सोडविणे आवश्यक आहे. या मुलांना गरजेयोग्य शैक्षणिक साहित्य मिळाल्यास निश्‍चितपणे देशाचे भवितव्य उज्ज्वल आहे.