शिंदाड । जिल्हा परिषद ही ग्रामीण जनतेचा विकासाचा केंद्रबिंदु आहे. जिल्हा परिषदही स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्वोच्च स्थरावर आहे. जिल्हा परिषदेतील महसूल हा समान्य जनतेने भरलेल्या करातुन जमा होतो. या महसूलीचा योग्य वापर व्हायला हवे मात्र पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर ते अडळगव्हाण कोल्हे रस्त्यावर गरज नसतांना पुलाचे बांधकाम होत असल्याने शासनाचा पैसा वाया जात आहे. ज्याठिकाणी पुलाचे बांधकाम केले जात आहे.
पुलाऐवजी गुरांसाठी हौद बाधलास अधिक उपयोग होणार
त्याठिकाणी गुरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याठिकाणी पाईप आणुन टाकल्याने गुरांच्या पाण्याची गैरसोय होणार आहे. जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी हे काम मंजुर केले नसल्याचे सांगितले. खटकाळ नदीवर हा खर्च केल्यास कोल्हे भागातील शेतकर्यांची मोठी सोय होणार आहे. जिल्हा परिषदेकडून दोन दिवसापूर्वी या ठिकाणी 6 पाईप व दगड वाळु आणुन ठेवले आहे. प्रशासनाने हा रस्ता खराब करु नये अशी मागणी नागरिकांमधुन होत आहे.