गरताड येथील युवकाची आत्महत्या

0

शिरपुर । धुळे तालुक्यातील गरताळ येथील एका मेडिकल सेल्समनने शिरपुर तालुक्यातील सावळद गावालगत असलेल्या तापी पुलावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली.दरम्यान 24 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास प्रेत मिळुन आले. त्याने नेमके काणत्या कारणाने आत्महत्या केली याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

मेडीकल कंपनीत होता नोकरीस
23 रोजी संध्याकाळच्या सुमारास राहुल कृष्णा पवार-पाटील(25) राहणार गरताळ ता. धुळे याने सावळदे गावाजवळ तापीनदीच्या पुलावरुन स्वत:ची दुचाकी गाडी लावुन उडी मारल्याची घटना घडली होती. राहुल पुणे येथील जिनो फार्मा या कंपनीत मेडिकल सेल्समन म्हणुन कामाला होता. त्याच्याकडे शिरपुर तालुक्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. गेल्या महिन्यातच त्याचा विवाह झाला होता. सदरचे वृत्त त्याच्या आप्तजणांना रात्री उशीरा समजल्यावर 24 रोजी सकाळपासून तापी पात्रात शोध मोहीम सुरू सुरू झाले. दुपारी 12 च्या सुमारास त्याचे प्रेत मिळुन आले. याबाबत नरडाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यु नोंदविण्यात आला आहे. त्याच्या पश्‍चात आई दोन भाऊ, असा परिवार आहे. गेल्या महिन्यात त्याचा विवाह झाला होता.