गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना मदत करणे यातच खरा आनंद

0

चाळीसगाव । खेड्यापाड्यात गरीबीच्या परिस्थितीमुळे पालक आपल्या मुला-मुलींना आवश्यक ते शैक्षणिक साहित्य घेऊन देऊ शकत नाहीत.त्यामुळे विद्यार्थ्यांचे गैरहजेरीचे प्रमाण वाढते. अश्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांनी शाळेत आपल्या वर्गशिक्षकांना कोणते शैक्षणिक साहित्य नाही हे हे सांगून आपले नाव नोंदवावे.म्हणजे अश्या विद्यार्थ्यांना ते, ते साहित्य पुरवले जाईल.खरेतर गरजू व गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यात मला खरा आनंद वाटतो, असे प्रतिपादन समाज कल्याणचे माजी सभापती राजेंद्र राठोड यांनी काढले. पिंपरखेडतांडा ता.चाळीसगाव येथील आश्रम शाळेतील प्राथमिक विभागातील गावातून,तांड्यातून व परिसरातील खेड्यांमधून शाळेत येणार्‍या अनिवासी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना 12 डिसेंबर 17 मंगळवार रोजी वह्या सप्रेमभेट म्हणून देण्यात आल्या.त्यावेळी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून ते व्यासपीठावरून बोलत होते.

त्याप्रसंगी त्यांचेसोबत प्रमुख अतिथी म्हणून चाळीसगाव येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश खंडेलवाल, तसेच प्राथमिक विभाग मुख्याध्यापक एम.डी.बागुल,माध्यमिक व उच्चमाध्यमिक विभाग प्राचार्य आर.बी.उगले, पर्यवेक्षक एस.एस.पवार, आश्रमशाळा कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक मोरसिंग जाधव, अधिक्षक प्रमोद राठोड हेही व्यासपीठावर उपस्थित होते. वह्या वाटप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी-शिक्षक मनोहर आंधळे यांनी केले.तर आभार एम.डी.बागुल यांनी व्यक्त केलेत. याप्रसंगी शाळेतील तीनही विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.