गरूड विद्यालयात आदर्श शिक्षकांचा सत्कार

0

गावातील मान्यवरांच्या हस्ते शिक्षकांचा गौरव

शेंदूर्णी – गरुड माध्यमिक विद्यालयात ५ सप्टेंबर शिक्षक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष दुसाने यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रम प्रस्तावना विद्यालयाचे प्राचार्य डी.आर.शिंपी यांनी केली. त्यावेळी त्यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी इयत्ता पाचवी ते सातवी विभागात शिक्षक असलेले एन.ए.राठोड तसेच आठवी ते दहावी विभागाचे बी.टी.बोरसे, कनिष्ठ महाविद्यालयाचे विभागातील एस.व्ही.जावळे आणि प्रयोगशाळा परिचर भरत पाटील या सर्वांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन पत्रकार अशोक जैन, विलास अहिरे, दीपक जाधव यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परीश्रम
यावेळी विद्यार्थिनी मधून कु.प्रणाली रगडे, भक्ती शेरे, वैष्णवी माळी, वैष्णवी गोसावी, कोमल पाटील, तेजस्विनी बुधवंत, गौरी बारी यांनी शिक्षकांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी उपमुख्याध्यापक सुहास संघवी यांनी आपले विचार मांडले. शाळेतील विद्यार्थीनी आज सर्व वर्गात जाऊन उत्तम प्रकारे अध्यापनाचे काम केले आणि विद्यार्थ्यांनी वृक्ष भेट दिले.