गरोदर महिलेची आत्महत्या

0

पिंपळे निलख – पतीच्या जाचाला कंटाळून दोन महिन्यांच्या गरोदर महिलेने जाळून घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी घडला. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केले आहे. मनिषा राजेंद्र प्रजापती (वय 25, रा. पिंपळे निलख, मूळ उत्तरप्रदेश), असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पती राजेंद्र प्रजापती (वय 29) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मनिषाचा भाऊ मनोजकुमार प्रजापती यांनी फिर्याद दिली होती.

मनिषा व राजेंद्र यांचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना अडीच वर्षांचा मुलगा आहे. ते मूळचे उत्तरप्रदेशचे होते. राजेंद्र हा त्याचा भाऊ व भावजई सोबत रहात होता. दरम्यानच्या काळात दोन महिन्याची गरोदर राहिली होती. यावेळी मनिषाला बाळ नको होते तर राजेंद्रला बाळ हवे होते. त्यात राजेंद्र तिच्या दिसण्यावरुन व कमी मिळालेल्या हुंड्यावरुन सतत टोचून बोलत असे. त्यामुळे सोमवारी राजेंद्र हा आंघोळ करत असताना स्वतःला जाळून घेतले. गंभीररित्या भाजल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.