भुसावळ। मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली स्थानकाजवळ 6 तासांचा व अंबरनाथ – बदलापुर दरम्यान 4 तास 30 मिनीटांचा पावर ब्लॉक आज 25 रोजी घेण्यात आला आहे. त्यामुळे काही गाड्यांच्या धावण्याच्या वेळा तात्पुरत्या स्वरुपात विस्कळीत झाल्या आहेत.
ठाकुर्ली स्थानकाजवळ सकाळी 9.15 ते दुपारी 3.15 वाजेदरम्यान 6 रुळांवरील पुलाचे गर्डर टाकण्यात येणार आहे. तर अंबरनाथ – बदलापुर स्थानकादरम्यान अप आणि डाउन लाईन वरील पुलांच्या पुर्ननिर्माणासाठी वाहतुक आणि पावर ब्लॉक घेतला जात आहे. त्यामुळे गाडी क्रमांक 12109/12110 मनमाड-मुंबई-मनमाड पंचवटी एक्सप्रेस, गाडी क्रमांक 12117/12118 मनमाड- मुंबई-मनमाड गोदावरी एक्सप्रेस 25 रोजी रद्द करण्यात आली आहे.
सेवाग्राम एक्सप्रेस तीन तास उशिरा
गाडी क्रमांक 12140 नागपूर- मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस नाशिकरोड स्थानकावर सकाळी 7.30 वाजेला शॉर्टटर्मिनेट करण्यात येईल. तर गाडी क्रमांक 12139 मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस जी दुपारी 3 वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनसवरुन धावते ती सायंकाळी 6.35 वाजता नाशिकरोड स्थानकाहुन सुटेल.
नाशिक मार्गावरील गाड्यांची स्थिती
नाशिक स्थानकाहुन मुंबई स्थानकाकडे रवाना होणार्या गाडी कल्याण स्थानकापासून रेग्युलेट होतील. त्यात गाडी क्रमांक 12321 हावडा सीएसटी मुंबई हीचा निर्धारीत वेळ सकाळी 11.25 वाजेचा असून दुपारी 2 वाजेला पोहचेल. गाडी क्रमांक 13201 राजेंद्रनगर एलटीटी एक्सप्रेस जीचा निर्धारीत वेळ सकाळी 11.30 वाजेचा असून ती दुपारी 2 वाजेला पोहचेल.गाडी क्रमांक 04115 इलाहाबाद -एलटीटी विशेष जलद गाडी जीचा वेळ 12.15 वाजेचा आहे ती 1.45 वाजता आगमन करेल, 12168 वाराणसी- एलटीटी एक्सप्रेस दुपारी 1.55 वा. पोहचेल, 12072 जालना-दादर जनशताब्दी एक्सप्रेस ही दुपारी 3 वाजेला येईल, 12812 हटिया एलटीटी एक्सप्रेस ही दुपारी 3.30 वाजेला स्थानकात येईल, 11094 वाराणसी सीएसटी महानगरी एक्सप्रेस दुपारी 3.45 वाजेला, 12294 इलाहाबाद -एलटीटी दुरंतो एक्सप्रेस दुपारी 3.45 वाजता, 12124 पाटलीपुत्र एलटीटी एक्सप्रेस सायंकाळी 4 वाजेला पोहचणार आहे.
मुंबई मार्गावरील गाड्यांची स्थिती
तसेच गाडी क्रमांक 11055 एलटीटी गोरखपूर एक्सप्रेस ही लोकमान्य टिळक टर्मिनस वरुन सकाळी 10.55 वाजे ऐवजी दुपारी 12 वाजेला सुटेल, गाडी क्रमांक 12542 एलटीटी गोरखपूर एक्सप्रेस ही सकाळी 11.10 वाजेऐवजी दुपारी 12.15 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटेल. आणि गाडी क्रमांक 12869 छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई हावडा एक्सप्रेस सकाळी 11.05 वाजे ऐवजी 11.50 वाजेला सुटणार आहे.