गळफास लागून बालकाचा मृत्यू

0

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील सुनसगाव येथे बालकाच्या गळ्यास दोरीचा फास लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

कृष्णा प्रकाश महाजन (वय ११) तसेच अन्य काही बालके गावाबाहेर चिंचेच्या झाडाजवळ खेळत होते. या झाडाला असलेली दोरी धरून खेळण्याचा प्रयत्नात कृष्णा याचा गळा आवळला गेला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.