बारामती । बारामतीचे माजी नगरसेवक विजय गव्हाळे यांच्यावरील हल्ल्याचा समरसता मंचच्या वतीने तीव्र निषेध केला आहे. 3 सप्टेंबर 2017 रोजी हा हल्ला झाला होता.
गव्हाळे हे दलित चळवळीतील एक जेष्ठ नेते आहेत. आंबेडकरी विचार पुढे नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. सामाजिक प्रश्नांची उत्तम जाण असलेले, अभ्यासू विचारवंत अशी त्यांची ओळख आहे. या गुणांमुळे समाजात त्यांना मानाचे स्थान आहे, असेही या निषेधपत्रात मंचाने म्हटले आहे. अशा व्यक्तिवर भ्याडपणे हल्ला व्हावा, हे अत्यंत दुर्दैवी आहे. अशा हल्ल्याने विचार मरत नाहीत. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी संबंधित यंत्रणांनी जलद गतीने तपास करून हल्लेखोराचे पितळ उघडे पाडावे, असे आवाहन सामाजिक समरसता मंचाने केले आहे.