गांजा तपासणी करण्याच्या नावाखाली कन्हेरेतील शेतकर्‍याची एक लाखांची रोकड लंपास

Claiming to be a ganja inspection officer, cash of Rs One lakh was advanced from a farmer : incident in Parola taluka पारोळा : तालुक्यातील कन्हेरे गावातील शेतकरी गावाकडे पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन संशयीतांनी गांजा-अफू तपासणी करणारे अधिकारी असल्याचे सांगत शेतकर्‍याची झडती घेत पिशवीतील एक लाखांची रोकड घेवून पोबारा केला. ही घटना पारोळा तालुक्यातील रामनगर तांडा गावाजवळ सोमवार, 14 रोजी दुपारी दिड वाजता घडली. याबाबत पारोळा पोलिस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

पिशवीतील एक लाखांची रोकड लुटत पोबारा
शेतकरी सुरेश पंडित पाटील (52, कन्हेरे, ता.पारोळा) हे मंगळवार, 14 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास पारोळा तालुक्यातील तांडा फाट्याजवळ गावाकडे पायी जात असताना त्यांच्या मागून अज्ञात दोन जण दुचाकीवरून आले व त्यांनी आम्ही गांजा/अफू चेक करणारे अधिकारी असल्याचे सांगत शेतकर्‍याच्या हातातील कापडी पिशवी चेक केली. त्यात एक लाख रुपये असल्याने हे पैसे कशाचे आहेत ? असे विचारल्यावर मी बँकेतून काढले असल्याचे शेतकरी सुरेश पाटील यांनी सांगितले. त्यावर ‘आम्ही चेक करू’ असे बोलून त्यांनी एक लाख रुपये घेऊन दुचाकीवरून पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुरेश पाटील यांनी पारोळा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत.