जळगाव । शहरातील स्थानिक गुन्हे शाखा पथकाची धडाकेबाज कारवाई सुरू असून शनिवारी देखील पथकाने अडवद-चोपड्यावर रस्त्यावर सापळा रचत मध्यप्रदेशातून गांजा तस्करी करणारी चौघांची टोळी जेरबंद केली. झडती घेतल्यानंतर चौघांकडून 38 किलो गांजा मिळून आला आहे. दरम्यान, पथकाने गांजासह त्यांच्या तीन मोटारसायकली जप्त केल्या असून चौघांविरूध्द चोपडा शहर पोलिस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट कलम 8,20,22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हे चौघे मध्यप्रदेश राज्यातील बडवाणी जिल्ह्यातील आहेत.
गुळनदीच्या पुलावर पथक रात्रभर पथक सापळा रचून
मध्यप्रदेश राज्यातून यावल मार्गे चोपड्याकडे तीन ते चार तरूण हे मोटारसायकलींवरून गांजा तस्करी करून घेवून जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा विभागाचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक सुनिल कुराडे यांना मिळाली होती. ही माहिती पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांना कळविल्यानंतर त्यांनी तरूणांना पकडण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यानंतर शुक्रवारी कुराडे यांनी पथक तयार करून गांजा तस्करी करणार्या तरूणांना अटक करण्यासाठी अडावद-चोपडा रस्त्यावरील गुळनदीच्या पुलावर थांबून पथकाच्या सहाय्याने सापळा रचला. रात्रभर ते थांबून अखेर शनिवारी सकाळी 8 वाजता तीन मोटारसायकलींवर चार तरूण अडावदकडून चोपडा जातांना दिसताच त्यांनी चौघांना पकडले.
अशांचा होता पथकात समावेश
स्थानिक गुन्हे शाखा पथकाने शनिवारी गांजा तस्करी करणार्या चौघांच्या टोळीला जेरबंद केले. या पथकात वरीष्ठ पोलिस निरिक्षक सुनिल कुराडे, सपोनि. सागर शिंपी, मनोहर देशमुख, सतिष हाळनोर, विनोद पाटील, अशाक चौधरी, रविंद्र गायकवाड, दत्तात्रय बडगुजर, रविंद्र चौधरी, सुरज पाटील, रमेश चौधरी, मिलींद सोनवणे, विलास पाटील, सुशिल पाटील, विनयकुमार देसले, जयंत चौधरी, शरद सुरळकर, गफुर तडवी, अशोक पाटील, पंच प्रेमराज वामणराव पाटील, जिवय शामराव सपकाळे, वजन-काटा धारक आमीन शेख यासीन आदींचा समावेश होता.
यांना केली अटक
पोनि.कुराडे यांनी चौघांच्या मोटारसायकलीला अडकवलेल्या प्लास्टीकच्या पिशव्यांची झडती घेतल्यानंतर त्यात 38 किलो गांजा मिळून आला. चौघांची विचारपूस केल्यानंतर त्यांनी आपली नावे दिनेश सिताराम बारेला (वय-23, रा.कालीगुंडी. जि. बडवाणी), रबड्या सिताराम बारेला (वय-225, रा.कालीगुंडी. जि. बडवाणी), शिवराम गिनसा पावरा (वय-23, रा.चाचर्यापाणी. जि. बडवाणी), सुरेश देवार्या पावरा (वय-22, रा. गेरूघाटी.जि. बडवाणी) असे सांगितले. दरम्यान, पथकाने त्यांच्याजळवून 38 किलो गांजाहस 5 लाख 66 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात तीन मोटारसायकलींचा समावेश असून त्या पथकाने जप्त केलेल्या आहेत.