VIDEO…गांधीजींचे मारेकरी आजचे सत्ताधारी-स्वरा भास्कर

0

नवी दिल्ली – वादग्रस्त विधानावरून नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री स्वरा भास्करने पुन्हा एकदा विद्यमान सरकारवर निशाणा साधला आहे. ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे मारेकरी आज सत्तेत आहेत’ असे वादग्रस्त विधान स्वरा भास्करने केले आहे. नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत स्वरा भास्करने हे वक्तव्य केले.

हा आरोप करताना स्वराने कोणाच्या नावाचा स्पष्टपणे उल्लेख केला नाही. स्वराच्या या विधानामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. न देशभरात सुरू असलेल्या कथित नक्षलवादी ‘थिंक टँक’ अटकसत्रासंदर्भात स्वराचे विधान जोडण्यात येत आहे.

रक्तासाठी तहानलेला समाज बनणे ही चांगली गोष्ट नाही, अशी टीकादेखील यावेळी स्वरा भास्करने केली. भिंद्रनवाले यांनाही काही लोक संत म्हणत त्या सगळ्यांनाही उचलून तुरुंगात टाकणार का? असाही प्रश्न स्वरा भास्करने उपस्थित केला आहे.