गांधी जयंतीनिमित्त ‘समाजोपयोगी कामांचा सप्ताह’; लायन्स क्लबतर्फे आयोजन

0

तळेगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधी अर्थात बापु यांची 2 ऑक्टोबर रोजी जयंती असते. महात्मा गांधींनी आयुष्यभर समाजसेवा व स्वच्छता या तत्त्वांचा अवलंब केला. त्यांनी आपल्याला घालून दिलेला आदर्श अत्यंत उपयुक्त आहे. आपल्या परिने इतरांना मदत करणे, समाजोपयोगी उपक्रम राबविणे तसेच स्वच्छतेचे कार्यक्रम राबविले जात आहेत. गांधी जयंतीनिमित्त लायन्स क्लब ऑफ तळेगावतर्फे विविध समाजपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करून ‘समाजपयोगी कामाचा साप्ताह’ साजरा करण्यात येणार असल्याची माहिती, लायन्स क्लब ऑफ तळेगावच्या अध्यक्षा राजश्री शहा यांनी दिली.

राजश्री शहा पुढे म्हणाल्या की, 2 ऑक्टोबर रोजी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या समवेत 100 कचर्‍याच्या डब्यांचे वाटप करण्यात येणार आहे. हे कचर्‍याचे डबे पानटपरी, वडापाव विक्री दुकान, विविध सार्वजनिक देऊळ, शाळा, अशा ठिकाणी देण्यात येणार आहेत. तसेच दुकानदारांनाही वाटप करण्यात येणार आहे. 3 रोजी जेष्ठ नागरिकांचा सन्मान, एक्स-प्रेसवेवर ट्रॅफिक नियमांचे पालन करण्यासाठी परिपत्रक वाटप करण्यात येणार आहे. तसेच डायाबिटीस, कर्करोग आजारांवर महिलांसाठी तपासणी शिबिरचे आयोजन जिल्हा परिषद स्कूल इंदुरी येथे करण्यात आले आहे. 4 रोजी स्वराज्य नगरी येथील क्लब हाऊसमध्ये करण्यात आले आहे. 5 रोजी लायन विवेकानंद हॉल, कडोलकर कॉलनी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 6 व 7 रोजी कुंग-फू कराटे स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 7 रोजी तळेगावातील आठवडे बाजारात अन्नदान करण्यात येणार आहे. सर्वासाठी हृदयरोग, डायाबिटीस तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी रक्तदाब, ई.सी.जी., लिपीट प्रोफाईल, बॉडी मास्क ईंडेक्स, मधुमेह यांची तपासणी फक्त 50 रू. मध्ये मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल येथे करण्यात येणार आहे. 8 रोजी जिल्हा परिषद स्कूल, इंदुरी येथे चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.