गाडगेबाबा अभियांत्रिकीमध्ये सीईटी अर्जासाठी विनामूल्य मार्गदर्शन

0

ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात ; 23 मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना संधी

भुसावळ- अभियांत्रिकी व व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षेचा किंवा प्रत्यक्ष प्रवेशाचा अर्ज भरताना विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो म्हणून विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षांचा आणि प्रत्यक्ष प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज बिनचूक भरता यावा यासाठी भुसावळ येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे 4 जानेवारी 2019 ते 23 मार्च 2019 दरम्यान विनामूल्य मार्गदर्शन तसेच अर्ज भरून मिळणार आहे. यासाठी महाविद्यालयात समुपदेशन केंद्र कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी दिली.

विद्यार्थी प्रवेशापासून वंचित न ठरण्यासाठी उपक्रम
अभियांत्रिकी व विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी आणि प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरताना विद्यार्थी चुकीची किंवा अपुरी माहिती भरत असल्याचे गेल्या काही वर्षांपासून निदर्शनास येत आहे. परीणामी काही विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागते. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून महाविद्यालयाने समुपदेशन केंद्र कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी फोटोग्राफ्स व शैक्षणिक पात्रतेचे कागदपत्र सोबत आणावे, असे आवाहन समुपदेश केंद्र प्रमुख डॉ. पंकज भंगाळे यांनी सांगितले आहे. कॉम्पुटर सायन्स विभाग प्रमुख प्रा.दिनेश पाटील, मोहन पाटील हे समुपदेशन समितीचे सदस्य असून अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.