दापोली : दापोली- खेड मार्गावर शुक्रवारी सकाळी डंपरने एका कारला धडक दिल्याने एक अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाले आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.
दापोली- खेड मार्गावर मॅक्सिमो गाडीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या डंपरने धडक दिली. महामार्गावरील नारपोली गावाजवळील वळणावर हा भीषण अपघात झाला आहे.