शहादा । पुढील वर्षी शहादा येथे खान्देशस्तरीय गाडी लोहार समाजाचा वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्याच्या ठरावास अखिल भारतीय गाडीलोहार समाजाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत मंजुरी देण्यात आली. अ.भा.अध्यक्ष सुभाष बागुल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस माजी अध्यक्ष सुरेश भागवत(धरणगाव), कार्याध्यक्ष रमेश भागवत(धरणगाव), उपाध्यक्ष योगेश संगपाळ, सुभाष मोरे, धुळे समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण संन्यांसी, माजी नगराध्यक्ष अशोक बागुल, माजी नगरसेविका सुनिता बागुल आदी उपस्थित होते.
गावोगावी बैठका घेणार
गाडीलोहार समाजाच्या प्रगतीसाठी विविध विषयांवर यावेळभ चर्चा करण्यात आली. तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव व नाशिक अशा चार जिल्ह्यातील समाजाच्या वधू-वरांसाठी खान्देशस्तरीय परिचय मेळावा पुढील वर्षी शहादा येथे घेण्याबाबत सर्वांनी मान्यता दिली. मेळाव्या संदर्भात चारही जिल्ह्यातील समाजबांधवांना माहिती देण्यासाठी कार्यकारीणी सदस्य गावोगावी बैठका घेणार आहेत. जनगौरव आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल यावेळभ सुनिल सोमवंशी व कुणाल सोमवंशी या दोन्ही बंधूचा यावेळी समाजातर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल सोमवंशी यांनी केले तर मयुर भागवत यांनी आभार मानले. नरेंद्र संगपाळ, संजय हजारे, चंदन सोमवंशी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. मोहन भागवत(दांडाईचा), गोविंद डेंगळे, भिका जळोतकर(नंदुरबार), चंद्रकांत सोनवणे(शिरपूर) आदी समाजबांधव उपस्थित होते.