गाडेगावात 5 मे रोजी लेवा समाजाचा व्यवसाय मेळावा

0

एक हजार बेरोजगारांना मिळणार नोकरीच्या संधी

भुसावळ- लेवा समाजातील तरुण बेरोजगारांना औद्योगिक व वाणिज्य संस्थांमध्ये रोजगार मिळवण्यासाठी सहाय्य करणे, औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी उद्योजकांना आवश्यक सुविधा देणे, स्वयंरोजगाराच्या कौशल्यातून व्यवसाय निर्मिती करण्यासाठी चालना देण्याच्या उद्देशाने गाडेगावात 5 मे रोजी भव्य नोकरी उद्योग, व्यवसाय मेळावा घेण्याचे ठरले. शहरातील महालक्ष्मी मंदिरात लेवा पाटीदार समाजाची नियोजन बैठक झाली. प्रसंगी समन्वयक व नाशिक येथील उद्योजक राजेश नेहेते यांनी मार्गदर्शन केले.

एक हजार बेरोजगारांना मिळणार संधी
मेळाव्याच्या माध्यमातून नोंदणी केलेल्या उमेदवारांना त्या-त्या भागातील रोजगार मेळाव्यांमध्ये सहभागी होऊन संभाव्य संस्था चालक, मालकांबरोबर थेट मुलाखतीद्वारे रोजगार मिळू शकणार आहे. संस्थाचालक, मालकांनाही योग्य मनुष्यबळ तत्काळ मिळू शकणार आहे. यामध्ये किमान एक हजार उमेदवारांना तत्काळ रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. समाजातील बेरोजगारी कमी करणे व तरुणाईच्या हाताला रोजगार मिळवून देण्याचे काम मेळाव्याच्या माध्यमातून होणार आहे, असेही उद्योजक राजेश नेहेते यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती
गाडेगाव माजी सरपंच प्रल्हाद भारंबे, राजेश नेहेते, दिनेश भंगाळे, अनिकेत पाटील, प्रा.धीरज पाटील, योगेश कोलते, विश्वनाथ वारके, बबलू बर्‍हाटे, प्रकाश वराडे, निलेश वाणी, निता वराडे, डॉ. किशोर भारंबे, निता वराडे, चंद्रकांत जंगले, दिगंबर महाजन, नरेंद्र पाटील, लतेश भारंबे, किशोर पाटील, सुरेश बर्‍हाटे, नितीन फेगडे, रीतेश वारके, मनोहर बर्‍हाटे, लिलाधर भारंबे, योगेश पाटील, ध्रुवास महाजन, संजय वारके, पुरुषोत्तम खडसे, किरण पाटील, गोकुळ नेमाडे, महेश भारंबे, चंद्रकांत पाटील, मधुकर लोखंडे, धर्मराज देवकर, शशिकांत फेगडे, बंडू पाटील सह भुसावळ, नेरी, जळगाव, नाशिक, इंदौर, पुणे, मुंबई, सुरत, चितोडा, नशिराबाद, जामनेर, मोताडा, निपाणा येथून समाज बांधव उपस्थित होते. सूत्रसंचलन प्रा.धीरज पाटील तर आभार योगेश कोलते यांनी मानले.

नामांकित कंपन्यांचा राहणार सहभाग
या मेळाव्यात प्रमुख उद्योग, कारखाने तसेच माहिती तंत्रज्ञान, संरक्षण, हॉटेल उद्योग, व्यावसायीक आदी क्षेत्रांतील नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. संबंधीत कंपन्या प्रतिनिधींमार्फत इच्छुक उमेदवारांची मुलाखती घेऊन प्रत्यक्षात नोकरीची संधी उपलब्ध करून देणार आहेत. यासाठी सर्व दहावी, बारावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण, आयटीआय, अभियांत्रिकी, तसेच पदवी व पदवीधारक तरुणांनी याचा लाभ घ्यावा. नोकरी मेळाव्यासाठी गरजू उमेदवारांनी आपली माहिती, बायोडाटा 9270065775 या क्रमांकावर व्हॉट्सअप करावा, असे आवाहन आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.