गाते गावातील 21 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

रावेर : अवघ्या चार महिन्यांपूर्वीच विवाह केलेल्या रावेर तालुक्यातील गाते येथील 21 वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी घडल्याने खळबळ उडाली. सपना बाविस्कर (21) असे मयत विवाहितेचे नाव आहे. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही.

पती बाहेर पडताच आत्महत्या
सपना बाविस्कर या विवाहितेचा चार महिन्यांपूर्वी हर्षल बाविस्कर याच्याशी विवाह झाला होता मात्र बुधवरी सासु-सासरे व पतीदेखील बाहेर गेल्यावर सपना हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची माहिती रावेर पोलिसांना कळवल्यानंतर त्यांनी धाव घेतली.