पैशांच्या वादातून डोक्यात दगड घालून खून
तळेगाव । विनोद गायकवाड खून प्रकरणातील आरोपी शशिकांत शिंदे (वय 22) याला पोलिसांनी अटक केली आहे. पैशाच्या वादातून तिघा जणांनी शुक्रवारी मध्यरात्री विनोद गायकवाड याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना तळेगाव एमआयडीसी रस्त्यावरील आंबी गावच्या हद्दीत घडली होती. याप्रकरणी अरविंद गौतम निकाळजे यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात शशिकांत शिंदे व अनोळखी दोन इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
दुचाकी घातली अंगावर
विनोद गायकवाड आणि अरविंद निकाळजे हे दोघे शुक्रवारी रात्री 12.30 ते 1 वाजण्याच्या दरम्यान आंबी गावच्या हद्दीत वडगावकडे जाणार्या रस्त्यावरून दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी शशिकांत शिंदे याने मागून दुचाकीवरून येऊन गायकवाड यांच्या दुचाकीला धडक देऊन दोघांना खाली पडले. त्यानंतर पैशाच्या देवाणघेवाणीवरून चिडून मोटारसायकल चार ते पाच वेळा विनोदच्या अंगावर घातली. त्यानंतर तेथे पडलेला दगड विनोदच्या डोक्यात घालून त्याचा खून केला. शशिकांत शिंदे हा अरविंद निकाळजे यांचा आत्येभाऊ आहे. पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पाटील करीत आहेत.