सोलो कथकमध्ये अदिती पाटील प्रथम
पिंपरी : नंदकिशोर कल्चरल सोसायटी व नेहरू युवा केन्द्र क्रीडा मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 30 व 31 मार्च रोजी घेण्यात आलेल्या गायन, वादन, नृत्याच्या स्पर्धांचा बक्षिस समारंभ रविवारी पार पडला. हे या स्पर्धांचे 9 वे वर्ष आहे. या स्पर्धा विविध प्रकारात व विविध वयोगटात घेण्यात आल्या. या स्पर्धेत एकुण 250 स्पर्धकांनी भाग घेतला. यावेळी नेहरू युवा केन्द्राचे संचालक यशवंत मानखेडकर, प्रसिध्द कथक गुरू व नर्तक डॉ. पं. नंदकिशोर कपोते, करियर मार्गदर्शक गजेन्द्र बढे, पोलिस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेन्द्र कपोते, परीक्षक निकिता सिंह आदी उपस्थित होते.
स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे –
लहान गट (5 ते 11 वर्षे) – कथक सोलो – प्रथम अदिती पाटील, द्वितीय अनुष्का नगरकर. भरत नाटयम सोलो – प्रथम साक्षी पै, द्वितीय श्रीलक्ष्मी नंबियार. फिल्मी नृत्य सोलो – प्रथम किमया ठोके, द्वितीय लब्धी गुगळे, तान्या शर्मा. फिल्मी ग्रुप – प्रथम अश्विनी ग्रुप, द्वितीय नुपूर नृत्यालय, फिल्मीयुगलनृत्य – प्रथम मंजिरी नाडगौडा व श्वेता स्वामी, द्वितीय खुशी देशमुख, अथर्व देशमुख. सतार – प्रथम आयुष केंद्रे, द्वितीय किरण सावडे. शास्त्रीय गायन – प्रथम शौर्य हिर्लेकर, द्वितीय हिमाली देशमुख. सुगम संगीत – प्रथम सार्थक भोसले, द्वितीय वेदांती पाटील. तबला – प्रथम अर्णव कारके, व्दितीय शौैनक पाटील.
मोठा गट (12 ते 18 वर्षे) – कथक सोलो – प्रथम तन्वी गोडबोले, द्वितीय सायली कुलकर्णी. भरतनाटयम सोलो – प्रथम अंजली जयन, द्वितीय तन्वी कदम. फिल्मी सोलो – प्रथम आरती चव्हाण, द्वितीय हर्षदा बांदल, सुयश थिटे. फिल्मी युगलनृत्य – प्रथम स्नेहल भालेराव, समृध्दी भुते, व्दितीय नुपूर नृत्यालय. सतार – प्रथम अवधुत पाटील, द्वितीय विधी शर्मा, सुगम संगीत – प्रथम आर्या रजुलदास, द्वितीय विशाखा मोरे. तबला – प्रथम ॠषिकेश स्वामी, द्वितीय निखिल वाघमारे.
खुला गट (19 ते पुढे) – कथक सोलो – प्रथम भाग्यश्री तांबोळी, द्वितीय पृथ्वी भट. भरतनाटयम सोलो – प्रथम मानसी जगताप. फिल्मी नृत्य सोलो – स्नेहा इंगळे. फिल्मी युगल नृत्य – प्रथम प्रतिक्षा गायकवाड, नितू कटारिया. सतार – प्रथम वैशाली शिंदे, द्वितीय शिवानी संचेती, सुगम संगीत – प्रथम स्नेहल पटवर्धन, द्वितीय श्वेता मालोकर. तबला – प्रथम अथर्व गिजरे, द्वितीय अनिरूध्द जोशी.