गारखेडा शिवारातील गावठी दारुच्या भट्ट्या उध्वस्त

0

जामनेर – तालुक्यातील गारखेडा शिवारात गावठी दारूच्या हात भट्ट्या उध्वस्त करून एक जणास अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंद्या विरोधात “वॉश-आउट” मोहीम राबविण्यास सुरुवात केलेली असून जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यातील पोलीस विभागालाही त्यांनी अवैध व्यवसायांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी गुप्त माहितीवरून आपल्या सहकाऱ्यांसह गारखेडा शिवारातील वाघूर धरणाच्या काठावर गावठी दारूच्या अड्ड्यावर धाड टाकत तेथील गावठी दारू बनविण्यासाठी लागणाऱ्या साहित्य ५ पत्री टाक्या, कॅन, पत्री डबे अश्या साहित्यांची तोडफोड करून भट्ट्या उध्वस्त केल्या. दारू बनविण्यासाठी लागणारे कच्चे रसायन ताब्यात घेतले असून घटनास्थळी एका गावठी दारू व्यवसायिकास पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी पोलीस निरीक्षक यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक-विकास पाटील, पोहेकॉ संजय पाटील, विलास चव्हाण, अमोल वंजारी, निलेश घुगे, प्रदीप पोळ हे उपस्थित होते.