गावठी अड्ड्यांवर वरणगाव पोलिसांची धाड : 30 हजारांचे रसायन नष्ट

0

वरणगावच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांची धडाकेबाज कारवाई

भुसावळ- तालुक्यातील सावतर निंभोरा येथे बेकायदा गावठी दारू गाळपाचा अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांच्यासह पथकाने रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास धाड टाकत 800 लीटर कच्चे रसायन तर 70 लीटर गावठी दारू नष्ट केली. या कारवाईने अवैध धंदे चालकांच्या गोटात खळबळ उडाली असून पोलिसांना पाहताच आरोपी पसार झाले. सुमारे 28 हजारांचे गावठी दारू बनवण्याचे साहित्य नष्ट करण्यात आले असून या प्रकरणी राहुल येवले यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक निलेश वाघ, हवालदार सुनील वाणी, गोपाळ पाटील, मेहरबान तडवी, मजहर पठाण आदींचा पथकात समावेश होता. तपास हवालदार महेंद्र सुरवाडे करीत आहेत.