सांगवी : गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. ही कारवाई सांगवी पोलिसांनी ममतानगर येथील बालयोगी आश्रमाजवळ केली. उमेश सुरेश पवार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
बालयोगी आश्रमाजवळ एक इसम संशयितरित्या थांबला असून त्याच्याकडे गावठी कट्टा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सांगवी पोलिसांनी सापळा रचून संशयित इसमाला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस असल्याचे आढळले. गावठी कट्टा आणि काडतूस जप्त करण्यात आले असून आरोपीला अटक केली.