फैजपूर पोलिसांची कारवाई ; संशयीत आरोपी साकरीचे
फैजपूर- भुसावळ फैजपूर-रस्त्यावरील दुसखेडा फाट्यावर गावठी कट्टा बाळगणार्या दोघांना फैजपूर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी अटक केली. विलास छगन सोनवणे (35) व राजू भिकारी वाघ (28, रा.साकरी, ता.भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून दुसखेडा फाट्यावर दोन संशयीतांकडून गावठी कट्टा असल्याची माहिती कळाल्यानंतर सापळा रचण्यात आला.
यांनी केली कारवाई
डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय निकम, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ, पोलिस कॉन्स्टेबल राजेश बराटे, महेंद्र महाजन, सुमित बाविस्कर यांनी दुसखेडज्ञ फाट्यावर सापळा रचून विलास सोनवणे व राजू वाघ या दोघांना ताब्यात घेत त्यांच्याजवळ असलेले देशी बनावटीचे गावठी पिस्तुल हस्तगत केले. पोलीस कॉन्स्टेबल राजेश बराटे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास फौजदार आधार निकुंभे करीत आहे.