चोपडा/भुसावळ : गावठी कट्टे बनवून त्याची विक्री करण्याच्या प्रयत्नातील संशयीताला नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांच्या पथकाने पार उमर्टी येथून 3 रोजी सायंकाळी सात वाजेनंतर अटक केली. रात्री उशिरा आरोपीविरोधात चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुरूजीतसिंह अकबरसिंह बर्नाला (36, रा.उमर्टी, ता.वरला, जि.बडवानी, मध्यप्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई विशेष पथकातील वरीष्ठ पोलिस निरीक्षक बापू रोहम, एएसआय बशीर तडवी, हवालदार रामचंद्र बोरसे, कॉन्स्टेबल मनोज दुसाणे आदींच्या पथकाने केली.
आरोपीकडून कट्टा व मॅगझीन जप्त
संशयीत आरोपी गुरूजीतसिंह बर्नाला याच्या ताब्यातून 30 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा तसेच दोन हजार रुपये किंमतीचे मॅगझीन जप्त करण्यात आले आहे. संशयीत गावठी कट्टा बनवून त्याची विक्री करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोपीविरोधात चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.